| नेरळ | वार्ताहर |
आयुर्विमा महामंडळमध्ये कार्यरत असलेल्या अखिल भारतीय अनुसूचित जाती जमाती बौध्द आयुर्विमा कर्मचारी संस्थेच्यावतीने नेरळ गावात वृक्षारोपण करण्यात आले. गावातील सुनंदा संकुल येथे हे वृक्षारोपण करण्यात आले.
अखिल भारतीय अनुसूचित जाती-जमाती आणि बौध्द आयुर्विमा कर्मचारी कल्याणकारी संघटनेचे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. शहरातील सुनंदा संकुलमध्ये आयुर्विमा कर्मचारी संघटना यांच्याकडून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यावेळी सुनंदा संकुलमधील वृक्षारोपण कार्यक्रम संघटनेचे पश्चिम क्षेत्रीय प्रसारण आणि नियोजन समितीचे सचिव राज बालादकर तसेच, सुनंदा संकुलचे अध्यक्ष हंसराज साळवी यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रामधील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनीदेखील झाडे लावून सामाजिक उपक्रमात सहभाग घेतला.
त्यावेळी दिनकर बच्छाव, मानेक आहेर, कार्याध्यक्ष राजपाल सोनवणे, कोषाध्यक्ष किरण बागुल, सह कोषाध्यक्ष नंदू गवई, सक्रिय सभासद रामचंद्र पिरकड तसेच सामाजिक कार्यकर्ते आयुब आढाळ, हमीद शहा, राजेंद्र गायकवाड, अनंत कदम, राजू खोले, विजय परदेशी, रुपलता पगारे, ज्योती गायकवाड, अनिल सदावर्ते आदी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे नियोजन तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव रायगड भूषण राजेश गायकवाड यांनी केले होते.
नेरळमध्ये आयुर्विमा महामंडळाच्यावतीने वृक्षारोपण
