। नेरळ । प्रतिनिधी ।
जेष्ठ निरुपणकार आणि महारष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कर्जत तालुक्यात श्री सदस्यांनी वृक्षरोपण कार्यक्रम राबविला. डिकसल टेकडी आणि किरवली येथे वृक्षारोपण करण्यात आले. लावलेल्या झाडांचे संवर्धन देखील श्री सदस्य दररोज करीत असतात.डॉ नानासाहेब यांच्या पुण्यस्मरण निमित्त डीकसल येथे श्री सदस्यांनी टेकडीवरील तातोबा मंदिर परिसरात यावर्षी 150 वृक्षांची लागवड केली. मागील वर्षी 120वृक्ष लावले होते.तर किरवली येथील टेकडीवर देखील वृक्षारोपण श्री सदस्यांनी देखील डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांना वृक्षारोपण मधून आदरांजली वाहिली.