| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
प्रधानमंत्री आवास योजनेतर्गंत मे.व्ही.आर.पी. असोसिएशन यांच्या राजीव गांधी आवास योजने अंतर्गत दिलेल्या सर्वेक्षणाच्या व सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामासाठी प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तयार करण्यात आलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालांसाठी देय असलेल्या फी बाबतच्या विषयास स्थायी समिती सदस्यांनी मंजूरी दिली.
महापालिकेची स्थायी समितीची पहिल्या पंचवार्षिकमधली शेवटची सभा शुक्रवारी महापालिका मुख्यालयात अध्यक्ष नरेश ठाकूर यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष नरेश ठाकूर समारोपावेळी म्हणाले, माझ्या कारकिर्दीत महापालिका मुख्यालय, क्रिकेट केडमी, पायाभूत सोयी सुविधांची कामे, समाज मंदिरे अशी कामे झाली. सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, सर्व सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो.
यावेळी स्थायी समिती सदस्य, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त कैलास गावडे,कार्यकारी अभियंता संजय कटेकर, सहाय्यकआयुक्त वैभव विधाते, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य लेखा परिक्षक निलेश नलावडे, सचिव तिलकराज खापर्डे, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.