महात्मा गांधी वाचनालयातर्फे वृक्षलागवड

| खरोशी | वार्ताहर |

महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालय पेण येथे कडुलिंब वृक्ष लागवड करण्यात आली. गेली काही वर्ष राज्यात सातत्याने होणारी दुष्काळी परिस्थिती तसेच, अवकाळी पाऊस यामुळे अन्नदाता बळीराजा संकटग्रस्त झाला आहे. निसर्गाचा झालेला र्‍हास व परिणामी वसुंधरेचा ढळलेला समतोल यामुळे बिघडलेले निसर्गचक्र आता दुरुस्त करून या वसुंधरेला सुजलाम सुफलाम करणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. या निसर्गचक्रकरिता देशी वाणाची वृक्ष लागवड (दि.10) जून रोजी महात्मा गांधी ग्रंथालय व वाचनालय पेण येथे कडुलिंब वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी अरविंद वनगे (अध्यक्ष), सुनील सत्वे (कार्याध्यक्ष) व नम्रता पाटील सहाय्यक ग्रंथपाल तसेच संत मुक्ताई अभ्यासिकेतील विद्यार्थिनी पूजा साळी, काव्या गुप्ता उपस्थित होते.

Exit mobile version