‘स्वप्नपूर्ती’त वृक्षारोपण

| पनवेल | प्रतिनिधी |

या वर्षी गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकी जपत स्वप्नपूर्ती गृहसंकुल खारघर येथे पनवेल महानगर पालिकेच्या सहकार्याने माझी वसुंधरा अंतर्गत सुमारे 100 वृक्षांची लागवड करण्यात आली. पनवेल महानगर पालिकेचे खारघर विभागाचे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्या हस्ते वृक्षारोपण पार पडले. यावेळी जितेंद्र मढवी यांच्या वतीने उपस्थितांना माझी वसुंधरांतर्गत वृक्षसंगोपणाची शपथ देण्यात आली.

या गणेशोत्सवात शिवसेनेचे खारघर उप शहरप्रमुख गुरु म्हात्रे यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मंडळाचे सहावे वर्ष असून, त्यानिमित्त स्वप्नपूर्ती संकुलात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या मध्ये मुलांसाठी चित्रकला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा आदी कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. वेळी या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी पनवेल महानगर पालिकेचे उपायुक्त कैलाश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण चे मुख्य चव्हाण साहेब त्यांचे सहकारी प्रकाश गायकवाड आदीच्या सहकार्याने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी स्वप्नपूर्ती सोसायटी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष नितीन सूर्यवंशी, उपाध्यक्ष संतोष वाव्हल, नंदकुमार राजे, माधव सखाराम, राकेश वाणी, वैभव पाटील, अक्षय गायकवाड, सचिन बार्वे आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version