। पनवेल । प्रतिनिधी ।
खारघरमध्ये सिडकोने उभारलेल्या स्वप्नपूर्ती संकुलामध्ये स्वप्नपूर्ती सार्वजनिक सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळ यांच्यावतीने गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. हा गणेशोत्सव 2017 साली सुरू करण्यात आला असून, यंदाचे आठवे वर्ष आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रेपाळ आणि सचिव धनंजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रम म्हणून मुलामुलींच्या चित्रकला स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, मुलांच्या डान्स स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील सर्व रहिवाशांनी भाग घेऊन सामाजिक एकोपाचे दर्शन घडवले.
यावेळी माजी आ. बाळाराम पाटील, पनवेल कृउबाचे संचालक देवेंद्र मढवी, कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील, माजी उपमहापौर विक्रांत पाटील, खारघर महिला अध्यक्षा तेजस्विनी घरत, माजी नगरसेवक हरीश केणी, वासुदेव घरत आदींनी या ठिकाणी भेट देऊन स्वप्नपूर्ती गृहसंकुलातील रहिवाशांना शुभेच्छा दिल्या.