पालीवाला महाविद्यालयाच्या वतीने वृक्षारोपण

| पाली | वार्ताहर |
शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रविवारी प्राथमिक आरोग्य केंद्र पाली आणि शेठ ज.नौ. पालीवाला महाविद्यालय परिसर येथे वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजना गीत व प्रार्थना म्हणण्यात आली. त्यानंतर जांभुळ, पेरू, करंजी, रेन ट्री अशा विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड याप्रसंगी करण्यात आली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाली येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. ममता पांडे, डॉ. नंदकुमार मुळे, नीलम म्हात्रे, सायली चव्हाण, रोशन लांडगे उपस्थित होते. वृक्षारोपण करण्यासाठी रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. स्नेहल बेलवलकर, प्रा. ज्ञानेश्‍वर मुंढे, मारुती शिंदे आदींसह 97 स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. वृक्षलागवड कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधाकर लहुपचांग यांचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version