वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

। अलिबाग । वार्ताहर ।

सामाजिक कार्यकर्ते गौरव म्हात्रे हे आपला वाढदिवस दर वर्षी विविध सामाजिक उपक्रम करून साजरा करत असतात. यावर्षी रविवारी (दि.23) सारसई बागेची वाडी येथे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. बदलत्या वातावरणाचा पर्यावरणावर होत असलेला विपरीत परिणाम लक्षात घेता यावर्षीचा वाढदिवस पर्यावरणास पूरक असावा म्हणून वृक्षारोपण करून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी येथील 65 आदिवासी कुटुंबांना मोफत टॉवेलचे वाटप करण्यात आले. आदिवासी ग्रामस्थांनी पारंपारिक पद्धतीने स्वागत करून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी उरण सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र मढवी, सदस्य नामदेव ठाकूर, आदिवासी सेवक रत्नाकर घरत, पराग ठाकूर, गौरव म्हात्रे यांचे कुटुंबीय, मित्र परिवार आणि मोठ्या संख्येने वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version