। उरण । वार्ताहर ।
चिरनेर येथील सेकंडरी स्कूलचे 1985 साली दहावीत असलेल्या गृपचे पावसाळी स्नेहसंमेल्लन रविवारी (दि.23) बापूजी मंदिर येथे संपन्न झाले. यावेळी स्नेहसंमेल्लनाच्या निमित्त एकत्र आलेल्या जुन्या मित्रांनी बापूजी मंदिर परिसरात आंबा आणि करंज वृक्षांची लागवड केली. तसेच, वृक्षारोपण करून इतर पर्यावरणप्रेमींना देखील हा चांगला संदेश देण्यात आला. त्याचबरोबर ही झाडे जगविण्यात येतील अशी हमी देखील त्यांनी दिली. तसचे, पर्यटकांकडून या परिसरात प्लास्टिक बाटल्या आणि प्लास्टिक पिशव्या टाकल्या जातात, त्यादेखील उचलून या परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी मिलिंद खारपाटील, चंद्रहास म्हात्रे, सुर्यकांत म्हात्रे, पद्माकर फोफेरकर, प्रकाश फोफेरकर, प्रकाश नारंगीकर, पंढरीनाथ नारंगीकर, सुरेश केणी, रोहिदास पाटील, सुभाष पाटील, दिपक म्हात्रे, राजेंद्र मुंबईकर, विजय पाटील, उपकार ठाकूर, प्रभाकर ठाकूर, रवींद्र पाटील, विजय मुंबईकर वर्गमित्र उपस्थित होते.