चिल्हे येथे वृक्षारोपण कार्यक्रम

| खांब | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथील राष्ट्रीय हरित सेना व धाटाव औद्योगिक वसाहतीमधील नामांकित सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सी.एस.आर विभागांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

यावेळी सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीजच्या सी.एस.आर प्रमुख माधुरी सणस नव्या युगाचे नवे आराधन, सतत करुया वनसंवर्धन या प्रमाणे सतत वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे. वृक्षांचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. मानवाला अन्न, वस्त्र, निवारा याची गरज असतेच पण त्याहून ऑक्सिजनची आवश्यकता आहे. यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करुन वनसंवर्धन करणे ही प्राथमिक जबाबदरी आहे, असे मत व्यक्त केले.

यावेळी मुख्याध्यापक दीपक जगताप, सर्व शिक्षक वर्ग, राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी, ग्रुप ग्रामपंचायत तळवली तर्फे अष्टमीचे सरपंच रविंद्र मरवडे, उपसरपंच संदीप महाडिक, सदस्य निलम मरवडे,ग्रामसेवक अधिकारी व कर्मचारी आणि सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज सी.एस.आर प्रमुख माधुरी सणस, महेश डेरीया,ॲड.विशाल घोरपडे,विक्रम वाबळे, सचिन येरुतकर ,बबन आडसुळ अमर चांदणे ,विनय देशमुख ,व सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज चे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार मरवडे यांनी व आभार प्रदर्शन रवि दिघे यांनी व्यक्त केले.

Exit mobile version