तळा बसस्थानकात प्रवाशांचे हाल

। तळा । वार्ताहर ।

तळा बसस्थानकातून एसटीच्या फेर्‍या बंद असल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. प्रासंगिक करारानुसार रायगड जिल्ह्यातील बस गुजरात सिल्वासा येथे रवाना झाल्या आहेत. 24 एप्रिल पासून तीन दिवसांच्या झालेल्या प्रासंगिक करारानुसार रायगड विभाग नियंत्रक कक्षाच्या माध्यमातून पेण, अलिबाग, कर्जत, रोहा, मुरुड, माणगाव या सहा आगारातून सत्तर गाड्या गुजरात सिल्वासा येथे रवाना झाल्या आहेत. तळा बसस्थानकातून ग्रामीण भागासाठी रोहा व माणगाव आगाराच्या बहुतांश बस असतात. परंतु रोहा व माणगाव आगाराच्या बस देखील गुजरात सिल्वासा येथे पाठविण्यात आल्याने तळा बसस्थानकातील जवळपास तेरा एसटीच्या फेर्‍या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे येथील प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी प्रवाशांना खाजगी वाहनाने जास्तीचे पैसे खर्च करून प्रवास करावा लागत आहे.

Exit mobile version