। तळा । प्रतिनिधी ।
तळा बसस्थानकात रविवारी बसच्या कमतरतेमुळे प्रवाशांचे हाल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. रविवारी रोहा डेपोच्या दोन व माणगाव डेपोची एक बस लग्न सराईमुळे आरक्षित असल्याने तळा बसस्थानकात पाठविण्यात आल्या नाहीत. याचा फटका तळा बसस्थानकातील प्रवाशांना बसला असून तळा बसस्थानकातुन सुटणार्या रहाटाड, कासेखोल, इंदापूर, रहाटाडवाडी आदी बस रद्द करण्यात आल्या. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. यावेळी एसटी महामंडळ प्रशासनाने लग्न सराईच्या काळात जादा बसेसची व्यवस्था करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.