पंतप्रधान किसान सन्मान निधीची उद्या घोषणा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा नववा हफ्ता सोमवारी जाहीर करणार आहेत. पंतप्रधान साडेबारा वाजता व्हिडिओ कॉन्फ्रेन्सिंगद्वारे पीएम किसान निधीची घोषणा करणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. पीएम किसान निधी योजनेंतर्गत 19,500 कोटी रुपये 9.75 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. पीएम-किसान योजनेंतर्गत शेतकर्‍यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा केले जातात. चार महिन्यात एकदा अशी तीन हफ्त्यात ही रक्कम दिली जाते.

पीएम-किसान योजनेंतर्गत आतापर्यंत 1.38 लाख कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. याआधी मे महिन्यात 9 कोटींपेक्षा अधिक शेतकर्‍यांच्या खात्यात मदत जमा करण्यात आलीये. पीएम-किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा स्थानिक नोडल अधिकार्‍याकडे जाऊन शेतकरी या योजनेसाठी आपले नाव नोंदवू शकतो. लाभार्थी कोणाला ठरवायचं याबाबत निर्णय राज्य सरकारवर सोडण्यात आला आहे. लाभार्थींची यादी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येते. त्यानंतर केंद्र सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा करते.

Exit mobile version