| पुणे | प्रतिनिधी |
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (दि.1) पुणे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यावेळी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवणे तसेच शहरातील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे.
मोदी यांनीच यापूर्वी वनाज ते गरवारे कॉलेज या पुण्यातील पहिल्या मेट्रो मार्गातील एका टप्प्याचं उद्घाटन केलं होतं. यानंतर आता ते निगडी ते शिवाजीनगर या मार्गावरील फुगेवाडी ते शिवाजीनगर कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन टप्याचं उद्घाटन करणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, अशी विनंती ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती. मात्र पवारांनी आपण कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याचे स्पष्ट केले.