पी.एन.पी. महाविद्यालयात अमृत काल

अर्थसंकल्प विषयावर चर्चासत्र
। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य व अर्थशास्त्र विभागा अंतर्गत नुकतेच अमृत काल बजेट 2023 – 24 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यानी सादर झालेल्या अर्थसंकल्पाचा अभ्यास करणे आणि अर्थसंकल्प समजून घेणे हा होता.

या कार्यक्रमांमध्ये अर्थशास्त्र व वाणिज्य विभाग प्रमूख प्रा. डॉ. रसिका म्हात्रे यांनी अर्थसंकल्प कसा मांडला जातो, अर्थसंकल्प मांडण्यापर्यतची प्रक्रीया याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. प्रा. अक्षय पाटील यांनी इन्कम टॅक्स व शेअर बाजार यावरती होणारा बजेटचा परिणाम, प्रा. प्रीती पाटील यांनी बजेटची पार्श्‍वभूमी आणि बजेट मधील सप्तरिशी याविषयी विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.

या चर्चासत्रामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. टीवायबी कॉम मधील हर्षाली पाटील हिने अर्थव्यवस्थेत रुपया कसा येतो व तर श्‍वेता होलीकेरी हिने रूपया कसा खर्च केला जातो याविषयी सादरीकरण केले. निहाली पाटील हिने अर्थसंकल्पाचा इतिहास सगळ्यांना उलगडून दाखविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अश्‍विनी लोखंडे यांनी केले.

Exit mobile version