ज्वलिता गट्टू 91.8 टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड (सीबीएसई)चा सोमवारी (दि. 13) इयत्ता दहावीचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आला.
पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या होली चाईल्ड सीबीएसई स्कूल वेश्वीच्या शाळेचा निकाल 100 टक्के लागला आहे. घवघवीत यश संपादन करणार्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले आहे.
यामध्ये ज्वलिता गट्टू 91.8 टक्के (459/500) मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, वंश नागडा 85.2 टक्के (426/500), द्वितीय क्रमांक पटकावला, तर त्वालीया जुईकर याने 85 टक्के (425/ 500) मिळवून तृतीय क्रमांक पटकावला. इतर उत्तीर्ण झालेले बहुतांशी विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये नेत्रदीपक यश संपादन करून उत्तीर्ण झालेले आहेत.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील, मुख्याध्यापिका वेणी वेल्लईम्मल्ल, उपमुख्याध्यापिका सदाफ शहाबाजकर इतर सीबीएसई शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींकडून अभिनंदन करण्यात आले.