पीएनपी कॉलेजचा 99 टक्के निकाल

। अलिबाग । प्रतिनिधी ।

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये पीएनपी एज्युकेशन सोसायटीचा आर्ट्स, कॉमर्स व सायन्स वेश्‍वी-गोंधळपाडा बारावीचा निकाल 99 टक्के लागला असून संस्थेमधून सायन्समधील सिया राजेश अग्रवाल 88.67 टक्के गुण मिळवून प्रथम, हर्षाली संदीप नागावकर 83.67 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर भाव्य जैन 80.17 टक्के गुण मिळवून संस्थेत तृतीय आलेली आहे.

आर्ट्स विभागाचा निकाल 98.11 टक्के, कॉमर्स विभागाचा निकाल 98.33 टक्के, तर सायन्स विभागाचा निकाल 99.41 टक्के लागला असून कॉलेजचा निकाल 99 टक्के लागला आहे.

आर्ट्समध्ये हर्षाली संदीप नागावकर 83.67 टक्के गुण मिळवून प्रथम, सरिता यादव 78 टक्के गुण मिळवून द्वितीय, बिनयामिन अलाम 67 टक्के व श्रीराज थळे 67 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. कॉमर्समध्ये रिया मुलीक 74.83 टक्के गुण मिळवून प्रथम, नभी जाधव 70.67 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर संचिता राऊळ 67.83 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तर, सायन्समध्ये सिया अग्रवाल 88.67 टक्के गुण मिळवून कॉलेजमध्ये आणि संस्थेत प्रथम, भाव्य जैन 80.17 टक्के गुण मिळवून द्वीतीय, तर निती जैन 72.67 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.

सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आमदार भाई जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील, कॉलेजचे संचालक विक्रांत वार्डे, प्राचार्य रविंद्र पाटील, उपप्राचार्य निशिकांत कोळसे इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदींकडून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Exit mobile version