जागतिक एड्स दिनाच्या रॅलीत पीएनपी महाविद्यालय सहभागी

| अलिबाग | प्रतिनिधी |

जागतिक एड्स दिनानिमित्त 1 डिसेंबर रोजी जनजागृतीपर प्रभात फेरीचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच डॉ. अंबादास देवमाने, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या नियोजनानुसार करण्यात आले. या रॅलीत पीएनपी महाविद्यालय सहभागी झाले होते. या रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे प्रतिनिधी अप्पर जिल्ह्याधिकारी सुनिल थोरवे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पूर्वा पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, न्यायाधीश व सचिव अमोल शिंदे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या रॅलीकरिता जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शितल जोशी (घुगे), लायन्स क्लब श्रीबागचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, पी.एन.पी सिनियर कॉलेज एन.एस.एस. विभाग प्रमुख कार्यक्रमाधिकारी प्रा.पल्लवी पाटील, प्रा. वृषाली घरत उपस्थित होत्या.

यावेळी रॅलीकरीता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, जे.एस.एम. कॉलेज, पी.एन.पी. कॉलेज, नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. यावेळी पी.एन.पी. महाविद्यालयातील एन.एस.एस. विभागाचे विद्यार्थ्यांनीं फलक हातात घेऊन एड्स जनजागृती पर घोषवाक्यांसह अलिबाग शहरात रॅलीमध्ये सहभाग घेऊन एड्स बाबत जनजागृती केली.
या रॅलीमध्ये पी.एन.पी. कॉलेज एन.एस.एस. विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याबद्दल जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग संजय माने यांनी आभार मानले. पी.एन.पी सिनियर कॉलेज एन.एस.एस. विभाग प्रमुख कार्यक्रमाधिकारी प्रा.पल्लवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना एड्स जनजागृतीपर मार्गदर्शन केले.

Exit mobile version