मुलांमध्ये नाना पाटील हायस्कूल संघ ठरला अंतिम विजेता
। अलिबाग । प्रतिनिधी ।
जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय अलिबाग व प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय वेश्वी अलिबाग येथे दिनांक १४ व १५ असे दोन दिवसीय तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे पीएनपी संकुल वेश्वी येथील प्रांगणात आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेला तालुक्यातील १४, १७, १९ वयोगटातील मुली आणि मुलांच्या संघांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
१४ वर्ष वयोगटात मुलींमध्ये स. म. वडके विद्यालय चोंढी संघ ३१ गुणांनी अंतिम विजयी ठरला तर को. ए. सो. माध्यमिक विद्यालय बेलोशी उपविजेता ठरला. १७ वर्ष वयोगटात पी. एन. पी. ज्युनिअर कॉलेज वेश्वी अलिबाग संघ ३४ गुणांनी विजयी ठरला तर जा.र.ह. कन्या शाळा अलिबाग उपविजेता ठरला. १९ वर्ष वयोगटात ना. ना. पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पोयनाड हा संघ २ गुणांनी विजयी ठरला तर जे. एस. एम कॉलेज अलिबाग उपविजेता ठरला.
दुसर्या दिवसीय मुलांच्या स्पर्धेमध्ये १४ वर्ष वयोगटात ना. ना. पाटील हायस्कूल पोयनाड संघ १४ गुणांनी विजेता ठरला तर को. ए. सो. इंग्रजी माध्यम अलिबाग अंतिम विजेता ठरला. १७ वर्षं वयोगटात ना. ना. पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पोयनाड २६ गुणांनी विजयी ठरला तर जनरल अरुणकुमार वैद्य अलिबाग संघ उपविजेता ठरला. १९ वर्ष वयोगटात ना. ना. पाटील हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पोयनाड हा संघ ७ गुणांनी विजयी ठरला तर जनरल अरुणकुमार वैद्य अलिबाग संघ उपविजेता ठरला.
सर्व विजेत्या संघांचे पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील आणि पीएनपी संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, क्रिडा प्रशिक्षक प्रा. तेजस म्हात्रे यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.