पी.एन.पी. संकुलात ऑनलाईन सुविधा केंद्राचे उद्घाटन

शैक्षणिक व नोकरी संदर्भातील सर्व दाखले काढून मिळणार
। अलिबाग । वार्ताहर ।

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि श्री समर्थ कृपा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात उघडण्यात आलेल्या पी.एन.पी. ऑनलाईन सुविधा केंद्राचे सोमवारी (दि. 6) पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

तांत्रिकतेच्या या युगात सर्वच गोष्टी तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याने बरेचदा शैक्षणिक कामात, नोकरी संदर्भात किंवा सरकारी कामांमध्ये लागणाऱ्या कागदपत्रांसाठी भरपूर धावपळ करावी लागते. कित्येकदा पॅन कार्ड, जातीचा दाखला अशी अनेक कागदपत्रे काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ? हेही बर्याचजणांना माहीत नसते. त्यामुळे सर्वांचीच तारांबळ उडते. परंतु, कायमच गोरगरिबांच्या पाठीशी खमकेपणाने उभ्या असणार्या, संकटात असणाऱ्याच्या हाकेला ओ देत वेळोवेळी मदतीसाठी धावून जाणाऱ्या आणि अलिबाग तालुक्याची उत्तरोत्तर प्रगती करू पाहणाऱ्या शेकाप महिला आघाडी प्रमुख, नगरसेविका, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी महा-ई-सेवा केंद्राची भासणारी गरज ओळखून प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय आणि श्री समर्थ कृपा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात पी.एन.पी. ऑनलाईन सुविधा केंद्र सुरू केले आहे.

पी.एन.पी. ऑनलाईन सुविधा केंद्रात फक्त पी.एन.पी. महाविद्यालयाचे विद्यार्थीच नव्हे तर इतरत्र विद्यार्थ्यांसह पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनाही याचा लाभ घेता येणार आहे. एवढेच नव्हे तर, वेगवेगळ्या कौशल्यांचे तसेच वेगवेगळ्या क्षेत्रातील नोकर भरतीसाठीचे आवश्यक असणारे प्रशिक्षण शिबीर देखील महाविद्यालयात ठेवण्यात येणार आहेत. पीएनपी संस्था फक्त शिक्षणचं देत नाही तर विद्यार्थ्यांना नोकर भरतीसाठी मार्गदर्शन व संधी सुद्धा उपलब्ध करून देते.


या कार्यक्रमावेळी पीएनपी संकुलाचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, पीएनपी कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, प्रा. नम्रता पाटील, मुख्याध्यापक निलेश मगर, प्रा. रवींद्र पाटील, प्रा. दिनेश पाटील, युवा नेत्या हर्षदा मयेकर, विनायक पाटील, श्री समर्थ कृपाचे संचालक आशिष बाणे, अंकिता बाणे संस्थेचे जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

पी.एन.पी. ऑनलाईन सुविधा केंद्रातील सुविधा
अ‍ॅडमिशन फॉर्म, नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट, शिष्यवृत्ती, इडब्ल्यूएस 10% आरक्षण, जात पडताळणी, महिला आरक्षण, डोमेसाईल, मतदान कार्ड, उत्पन्नाचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन्स, जातीचा दाखला, पॅन कार्ड, विविध नोकर भरतीचे फॉर्म या सेवा पी.एन.पी. ऑनलाईन सुविधा केंद्रात उपलब्ध असणार आहेत.

पीएनपी मध्ये अनेक नवनवीन सुविधा आणत विद्यार्थ्यांना आणखी उत्तम दर्जाचे शिक्षण द्यायचे आहे. पीएनपी महाविद्यालयातून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थीनी हे शिक्षणासोबतच विविध कौशल्य घेऊन बाहेर पडायला हवी आहेत.

चित्रलेखा पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटी, कार्यवाह
Exit mobile version