पी.एन.पी पाष्टी हायस्कूलचा चित्रकला परीक्षेचा 100 टक्के निकाल


| म्हसळा | वार्ताहर |

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची माध्यमिक शाळा पाष्टी या शाळेचा नुकत्याच घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला परीक्षेचा 100 टक्के निकाल लागला शाळेमध्ये नेहमीच विविध उपक्रमांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले जाते विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा दृष्टिकोन समोर ठेवून दरवर्षी शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या शासकीय चित्रकला परीक्षेला विद्यार्थी बसवले जातात व दरवर्षी शाळेचा निकाल हा चांगला लागतो. त्याप्रमाणे यावर्षी शासकीय चित्रकला परीक्षेचा 100 टक्के निकाल लागला. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक सुदाम माळी यांनी प्रेरणा दिली. तसेच शाळेचे कलाशिक्षक ललित पाटील यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन केले.

या यशामध्ये शाळेचे शिक्षक प्रफुल पाटील,बिलाल शिकलगार, विनयकुमार सोनवणे, संदीप दिवेकर, प्रशांत जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा समितीचे अध्यक्ष राजाराम धुमाळ, पाष्टी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष राजाराम दिवेकर, पदाधिकारी शांताराम कांबळे, जगजीवन लाड, संतोष मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.

Exit mobile version