जिल्हास्तरीय विज्ञान मॉडेल स्पर्धेत पीएनपीचा प्रथम क्रमांक

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी वेश्वी अलिबाग, होली चाईल्ड सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवातील विज्ञान मॉडेल बनविण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा बहुमान उंचावला आहे.

या स्पर्धेत शाळेचे विद्यार्थी मनस्व थळे, स्निग्धा पाटील आणि सर्वेश साताळकर यांनी सहभाग घेतला होता, त्यांच्या अभिनव कल्पना, उत्तम सादरीकरण आणि कष्टाने त्यांना हे यश प्राप्त झाले. ही स्पर्धा जेएसएम महाविद्यालयात, भारत सरकारच्या युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या यशाबद्दल विद्यार्थ्यांना पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांचे अमूल्य प्रोत्साहन लाभले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वेल्लैयम्माल, उपमुख्याध्यापिका सदाफ शहाबाजकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Exit mobile version