पीएनपी शाळेचे विज्ञान प्रदर्शनात यश

| अलिबाग | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यातील कोकण उन्नती मित्रमंडळ, इंग्लिश मीडियम स्कूल श्रीवर्धन येथे तालुकास्तरीय 51 वे विज्ञान प्रदर्शन 2 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनात प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे सातगाव माध्यमिक विद्यालय, वडशेत वावे, श्रीवर्धन या विद्यालयातील विद्यार्थिनी आकांक्षा शशिकांत म्हामुणकर हिने प्रतिकृती (रोप लावणी यंत्र) यामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. शिक्षक पी.पी. पाटील यांचे तिला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. या दोघांचेही संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रेमा तरवडे यांनी अभिनंदन केले.

Exit mobile version