पीएनपी शाळांचा १०० टक्के निकाल

संस्थेत आकृती वारे ९० टक्के गुण मिळवून प्रथम

| अलिबाग | प्रतिनिधी | 

रायगड जिल्हयातील पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यमांमध्ये पीएनपी इंग्लिश मिडियम होली चाईल्ड स्कूल वेश्वी – गोंधळपाडा शाळेची विद्यार्थिनी प्रथा रत्नाकर पाटील 89.60 टक्के गुण मिळवून प्रथम, नियती विजय पाटील 88.20 टक्के गुण मिळवून द्वितीय तर चेतना विजय बांगर 88 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.

पीएनपीच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांचा निकाल 100 टक्के लागलेला असून मराठी माध्यमांच्या बहुतांशी शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या मराठी माध्यमांमध्ये कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा जांमरुंग शाळेचा विद्यार्थी आकृती सुरेश वारे 90 टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम आला आहे. मुरुड तालुक्यातील माध्यमिक शाळा काकळघर शाळेची विद्यार्थिनी भक्ती विनोद घडशी 88.60 टक्के गुण मिळवून द्वितीय तर अलिबाग तालुक्यातील माध्यमिक शाळा वेश्वी-गोंधळपाडा शाळेचा आर्यन समाधान महारनूर 87.40 टक्के गुण मिळवून तृतीय आलेला आहे.



सर्व उत्तीर्ण  विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील,  खजिनदार नृपाल पाटील,  कार्यवाह चित्रलेखा पाटील,  सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक,  शिक्षकेत्तर कर्मचारी आदींकडून अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version