पीएनपी इंग्रजी माध्यमांच्या सर्व शाळांचा निकाल 100 टक्के
। अलिबाग । प्रतिनिधी ।
दहावीच्या निकालात जिल्ह्यातील सर्व पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. पीएनपी एज्युकेशन सोसायटीमध्ये होली चाईल्ड इंग्लिश मीडिअम स्कूल वेश्वीची विद्यार्थिनी सिया राजेश अग्रवाल 95 टक्के गुण मिळवून संस्थेत प्रथम आली. माध्यमिक शाळा मोठी जुई उरणची विद्यार्थिनी मानसी जितेंद्र पाटील 93.80 टक्के गुण मिळवून द्वितीय, तर माध्यमिक शाळा मोठी जुई उरणची विद्यार्थिनी स्नेहा किशोर भोईरने 93 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
दरम्यान, इंग्रजी माध्यमांमध्ये होली चाईल्ड इंग्लिश मिडियम स्कूल वेश्वीची विद्यार्थिनी सिया राजेश अग्रवाल 95 टक्के गुण मिळवून प्रथम, खालापूर तालुक्यातील जाखोटिया इंग्लिश मिडियमचा साहिल सुनील चौधरी 92.80 द्वितीय, तर होली चाईल्ड इंग्लिश मिडियम स्कूल वेश्वीची तनु संतोष यादव 92 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. मराठी माध्यमांमध्ये माध्यमिक शाळा मोठी जुई उरणची विद्यार्थिनी मानसी जितेंद्र पाटील 93.80 टक्के मिळवून प्रथम, माध्यमिक शाळा मोठी जुई उरण विद्यार्थिनी स्नेहा किशोर भोईर 93 टक्के द्वितीय, तर माध्यमिक शाळा वेश्वी गोंधळपाडाचा विद्यार्थी नीरज नंदकुमार मिसाळ 92.60 टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
माध्यमिक शाळा वेश्वी गोंधळपाडा 100 टक्के, माध्यमिक शाळा पळस रोहा 100 टक्के, माध्यमिक शाळा पाष्टी म्हसळा 100 टक्के, माध्यमिक शाळा केलटे म्हसळा 100 टक्के, माध्यमिक शाळा बीड कर्जत 100 टक्के, माध्यमिक शाळा वडवली 100 टक्के, माध्यमिक शाळा सुगवे 100 टक्के, माध्यमिक शाळा कुसुंबळे 100 टक्के, माध्यमिक शाळा वायशेत 100 टक्के, माध्यमिक शाळा मोठी जुई 100 टक्के, माध्यमिक शाळा तळाघर 100 टक्के, माध्यमिक शाळा वडशेत वावे 100 टक्के, माध्यमिक शाळा काकळघर 100 टक्के, माध्यमिक शाळा मिठाघर 100 टक्के, माध्यमिक शाळा संदेरी म्हसळा 95 टक्के, माध्यमिक शाळा भेंडखळ 75 टक्के, माध्यमिक शाळा खारपाले 86 टक्के, माध्यमिक शाळा जांबरुंग 81 टक्के, होली चाईल्ड इंग्लीश मिडीअम स्कूल वेश्वी 100 टक्के, तर जी.जे.एम. इंग्लीश मिडीअम स्कूल खालापूर शाळेचा 100 टक्के निकाल लागला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष आ. जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी संजय मिर्जी, सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे.