| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने व पिल्लई एचओसीएल शाळा रसायनी यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा 2025/2026 मध्ये पीएनपी होली चाईल्ड स्कूल वेश्वी अलिबाग शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
17 वर्षा खालील मुलांमध्ये अमर जुगीलाल निषाद 3000 मीटर धावणे तृतीय क्रमांक, 19 वर्षा खालील मुलांमध्ये शिव शिवराम निषाद बांबू उडीत प्रथम क्रमांक मिळवून त्यांची मुंबई विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धेत निवड झाली आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील, होली चाईल्ड एस एस सी बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले व उपमुख्याध्यापिका शर्मिला शेटे, क्रीडा मार्गदर्शक अक्षय डाकी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







