| अलिबाग | प्रतिनिधी |
जिल्हा क्रीडा अधिकारी अलिबाग रायगड व कुस्ती प्रशिक्षण केंद्र वाडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग तालुकास्तरीय शालेय कुस्ती क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये पीएनपीच्या विद्यार्थांनी घवघवीत यश संपादन केले.
मुलींच्या 14 वर्ष वयोगटातील 30 किलो वजनी गटात त्रिशा जाधव, 33 किलो वजनी गटात आफ्रा मणियार, 50 किलो वजनी गटात अनन्या पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुलांच्या 75 किलो वजनी गटात निलेश मालुसरे याने प्रथम क्रमांक पटाकवला आहे. मुलांच्या 17 वर्ष वयोगटातील 60 किलो वजनी गटात अंश किल्लेकर व 71 किलो वजनी गटात निसर्ग पाटील यांनी द्वितीय क्रमांक, 92 किलो वजनी गटात तस्मय कोळी याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुलींच्या 17 वर्ष वयोगटातील 43 किलो वजनी गटात लावण्या पाटील व 46 किलो वजनी गटात मनस्वी मळेकर यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मुलांच्या 19 वर्ष वयोगटातील 74 किलो वजनी गटात आर्यन मयेकर, 79 किलो वजनी गटात करण भगत, 92 किलो वजनी गटात तन्मय लखन यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, मुलींमध्ये 50 किलो वजनी गटात लावण्या कनगुटकर, 53 किलो वजनी गटात निखि गावंड, 59 किलो वजनी गटात मदिहा मुकादम, 62 किलो वजनी गटात आर्या पेडणेकर, 65 किलो वजनी गटात यज्ञा म्हात्रे, 68 किलो वजनी गटात संचिता बना, 72 किलो वजनी गटात सई पाटील व 76 किलो वजनी गटात मनस्वी सावंत यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या सर्व खेळाडूंची जिल्हास्तरीय कुस्ती क्रीडा स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. या नेत्रदीपक यशाबद्दल पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, होली चाईल्ड एस.एस.सी. बोर्डच्या मुख्याध्यापिका निसर्गा चेवले, उपमुख्याध्यापिका शर्मिला शेटे, क्रीडा प्रशिक्षक अक्षय डाकी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







