जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पीएनपी वेश्वीला उपविजेतेपद

| अलिबाग | प्रतिनिधी |

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा 12 ऑक्टोबर रोजी सुधागड एज्युकेशन सोसायटीचे ग. बा. वडेर हायस्कूल व व. ग. ओसवाल ज्युनियर कॉलेज पाली सुधागड येथे पार पडल्या. यामध्ये पी.एन.पी. माध्यमिक शाळा वेश्वी-गोंधळपाडा शाळेस 17 वर्षाखालील मुलींच्या गटामध्ये उपविजेतेपद मिळाले आणि अटीतटीच्या अंतिम सामन्यात चुरशीची लढत देत द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला. विजेत्या खेळाडूंचे पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक निलेश मगर शाळेचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version