। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटी होली चाईल्ड सीबीएसई स्कूल वेश्वीमधील इयत्ता 4 थी मधील विद्यार्थी आशुतोष कुमार प्रसाद या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिम्पियाडमध्ये घवघवीत यश संपादन केले. आशुतोषला आंतरराष्ट्रीय कांस्य पदक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक मिळाला आहे. तसेच, गोल्ड मेडल ऑफ डिस्टिंक्शन आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला रोख रक्कम तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
आशुतोषच्या यशामुळे संपूर्ण शाळेला त्याचा सार्थ अभिमान आहे. संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका वेल्लईम्मल्ल वेणी यांनी उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदन केले. आशुतोष यांच्या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.