पीएनपीची किल्ले रायगड शैक्षणिक सहल

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभागामध्ये शिकत असलेल्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल किल्ले रायगड आणि महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे येथे काढण्यात आली होती.

मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार कला शाखेतील तृतीय वर्गाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना मराठ्यांचा इतिहास, आधुनिक महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास हे पेपर अभ्यासक्रमात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी व स्मृतीस्थळ रायगड तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्यासाठी केलेला सत्याग्रह या ऐतिहासिक घटनांचा संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात
आले होते.

ह्या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या चवदार तळ्याचा सत्याग्रह या घटनांचा संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी मदत झाली. ही शैक्षणिक सहल यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, प्राचार्य डॉ. ओमकार पोटे, कार्यालयीन मार्गदर्शक गबाजी गीते यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. इतिहास विभागाचे प्रा. मिलिंद घाडगे व प्रा. साईनाथ पाटील तसेच इतिहास विभागाचे सर्व विद्यार्थी यांनी या शैक्षणिक सहलीचे नियोजन केले होते.

Exit mobile version