| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीची पीएनपी वायएमपी स्कूल सांबरी-कुर्डुस येथील विद्यार्थ्यांनी लंडन कॉलेज तर्फे आयोजित केलेल्या ट्रिनिटी परीक्षेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतला होता. ही परिक्षा 25 सप्टेंबर रोजी पार पडली असून, या परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त करत 100 टक्के निकाल लावला आहे. ग्रामीण भागातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी ही परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली असून शाळेचे नाव उंचावले आहे.
या स्पर्धेमध्ये इयत्ता दुसरीतील गार्गी पिंगळे, इयत्ता तिसरीतील मुक्ती पाटील, कार्तिक पाटील, वेदांश शेळके, प्रित पाटील, दिशांत पाटील व इयत्ता पाचवीतील आरव पाटील या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. ही परीक्षा चांगले संवाद कौशल्ये, इंग्रजीमध्ये अस्खलितता, आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित करण्यास मदत करते. ही कौशल्ये केवळ शैक्षणिक कामगिरी वाढवत नाहीत तर या माध्यमातून भविष्यातील जागतिक संधींसाठी विद्यार्थ्यांना तयार केले जाते. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल पीएनपी संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, पीएनपी वायएमपी शाळेच्या मुख्याध्यापिका मेधा दुबे आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन केले आणि इतरांना अशा कौशल्य-वर्धक स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.






