कवी उमेश जाधव यांना कवी उमाकांत कीर पुरस्कार

सुधागड । पाली ।
सुधागड तालुक्यातील कवी उमेश जाधव यांना कवी उमाकांत कीर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. साहित्य क्षेत्रातील नामवंत संस्थांमध्ये कोकण विभागात आघाडीवर असलेल्या कोकण मराठी साहित्य परिषद या संस्थेकडून साहित्य क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या उमद्या कवींना, प्रतिवर्षी कवी उमाकांत कीर स्मृती पुरस्कार दिला जातो. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हा पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्‍वस्त रमेश कीर यांच्या हस्ते सोनोपंत दांडेकर महाविद्यालय पालघर येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात आला.या कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्‍वस्त मधु मंगेश कर्णिक, अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर, मोनिका गजेंद्रगडकर, केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, डॉ. प्रा. प्रदिप ढवळ, एल.बी. पाटील, सुधीर शेठ, अ. वि जंगम आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version