। माथेरान । वार्ताहर ।
हुतात्मा हिराजी पाटील ज्यु.कॉलेज कडाव येथे वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मरणार्थ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त विद्यार्थी, शिक्षकांसाठी काव्य मैफली कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
माथेरानचे नारायण सोनवणे यांनी वीर हुतात्मा हिराजी पाटील यांची कविता सादर करून विद्यार्थी, शिक्षकांना मार्गदर्शन केले आणि दोन्ही हुतात्म्यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू केलेल्या क्रांतिज्योतीमध्ये सक्रिय होण्यास सर्वांना आवाहन केले. कोकण मराठी साहित्य परिषद कर्जतचे अध्यक्ष शेळके यांनी कवीचे महत्व सांगून विद्यार्थ्याना माहिती दिली.
मारुती बागडे सर यांनी काव्यातून आदिवासी क्रांतिवीर यांची माहिती दिली.कार्यक्रमासाठी नरेंद्र साळुंके, मनीषा बैकर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.पौर्णिमा सोनवणे, योगिता जाधव,वैशाली ठोंबरे, मंदार मुरकुटे, सौरभ तेलवणे, सायली माडीक, शाम शेळके, यश मराडे इ. शिक्षक वृंद सक्रिय सहभागी होते.