कोमसाप तर्फे कविसंमेलन

। कोर्लई । वार्ताहर ।

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रोहा, मुरुड, तळा, माणगाव शाखेतर्फे महाकवी कालिदास जयंती निमित्ताने रोह्यातील निवी येथील बयोज फॉर्म येथे रविवारी (दि.7) सकाळी 10 वाजता वर्षासहल कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. कोमसापच्या वर्षा सहल निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष रायगड भूषण सुधीर, एल.बी.पाटील, अ.वि.जंगम, गणेश कोळी, सुखद राणे, स़ंध्या दिवेकर (रोहा), संजय गुंजाळ (मुरुड), हेमंत बारटक्के (तळा), अजित शेडगे (माणगाव), सिद्धेश लखमदे, विजय दिवकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Exit mobile version