पोलादपूर काँग्रेसचा उपोषणाचा इशारा

। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर नगरपंचायतीच्या अखत्यारीतील सावंतकोंड पार्टेकोंडदरम्यानचा जुना लोखंडी पुल दोन महिन्यांपूर्वी चोरीला गेल्यानंतर एफआयआर दाखल झाली. मात्र, सर्वशृत चोरांना अटक करण्यात चालढकल होऊन या लोखंडी पुलाचे भग्नावशेष घटनास्थळी टाकण्यात आले. त्यानंतर काँग्रेस शहरअध्यक्ष अमोल भुवड यांनी या प्रकरणी आरोपींना अटकेच्या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर सोमवारी याच सावंतकोंड पार्टेकोंड प्रभाग क्रमांक 1 मधील नळपाईपलाईन कापून चोरीला गेल्याने अमोल भुवड यांनी दि. 4 जून रोजी उपोषणास बसण्याचा निर्धार पोलादपूर पोलीस ठाण्यासह रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक, रायगड जिल्हाधिकारी, महाड प्रांताधिकारी आणि पोलादपूर तहसिलदार यांनाही दिला आहे.


दोन महिन्यांपूर्वी 4 ते 7 एप्रिल दरम्यान पोलादपूर शहरातील सावंतकोंड ते पार्टेकोंडदरम्यानचा लोखंडी पुल कापून चोरण्यात आल्याप्रकरणी काँग्रेस पक्षाचे विरोधीगटाचे नगरसेवक आक्रमक झाले. या चोरीमध्ये विद्यमान लोकप्रतिनिधींचा समावेश असल्याचा आरोप यावेळी विरोधी गटाकडून उघडउघड होऊ लागला. या सर्वशृत चोरांविरूध्द कायदेशीर कारवाई होण्यासाठी पोलादपूर शहर काँग्रेस अध्यक्ष अमोल भुवड यांनी नआंदोलन छेडण्याचा इशारा दिला असताना दोनच दिवसांत यिाच सावंतकोंड पार्टेकोंड प्रभाग क्रमांक 1 मधील नळपाईपलाईन कापून चोरी करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने संतप्त काँग्रेसजनांनी याप्रकरणी लोखंडी पुल आणि नळपाणी योजनेचे पाईप चोरणार्‍यांना तातडीने अटक न केल्यास येत्या शनिवार, दि. 4 जून रोजी पोलादपूर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.

Exit mobile version