रसायनीक कंपन्यांऐवजी लघुउद्योग कारखान्यांची मागणी
| महाड | प्रतिनिधी |
पोलादपूर तालुक्यातील बहुचर्चित जाणारी मिनी औद्योगिक वसाहतीचे घोंगडे गेली अनेक वर्षे भिजत पडले आहे, त्याला कोणत्याही प्रकारची गती नसल्याने नियोजित औद्योगिक वसाहत हे फक्त आश्वासन राहिले आहे या ठिकाणी लघुउद्योगाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.गुगलवर सर्च केल्यास त्याबाबतचा नकाशा दिसतो.मात्र प्रत्यक्षात मात्र त्या एमआयडीसीची उभारणीच आजतागायत झालेली नाही.
पोलादपूर तालुका नैसर्गिकदृष्टया संपन्न असला तरी तेथे पर्यटनवृद्धी किंवा स्थानिकांना रोजगार मिळवून देण्याच्या उद्देशाने मागील अनेक वर्षात कोणतीच पावले उचलली गेली नाहीत. तालुका दुर्लक्षित राहिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी चे तालुक्यातील मूलभूत प्रश्न कडे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यातील मिनी औद्योगिक वसाहत सह धरणाची कामे गेल्या अनेक वर्षापासून अपूर्ण आहेत. परंतु पर्यटन स्थळाचा विकास केल्यास त्यांना नकाशावर आणल्यास तालुक्यातील दळणवळण वाढेल आणि आर्थिक स्तर उंचावेल. तालुक्यातील विकास कामे मार्गी लागण्याची शक्यता असून रोजगार देखील वाढेल.अशी अपेक्षा आहे.
पावसावर भातशेती अवलंबून असल्याने संसाराचा गाडा कसाबसा हाकणारा इथला शेतकरी आजही मुंबईतून येणा-या मनिऑर्डवरच विसंबून आहे. त्यामुळे शाळा-कॉलेज करूनही हाताला काम नसल्याने तरुणांना कामधंदा व रोजगार मिळवण्यासाठी मुंबई पुण्याकडे जावे लागते. अनेक वाडी-वस्तीत टुमदार घरे आहेत. मात्र या प्रत्येक घरातील माणूस नोकरी- व्यवसायानिमित्त मुंबईत असल्याने ही घरे बंद आहेत. . रोजगारासाठी गावागावांतून मोठया प्रमाणावर होणारे हे स्थलांतर रोखण्यासाठी लोकप्रतिनिधी अथवा राजकारण्यांकडून काय प्रयत्न होणार, असा सवाल उपस्थित होत आहे
शेतीसाठी अग्रेसर असलेला पोलादपूर तालुका रायगड जिल्ह्याचे शेवटचे टोक व डोंगराळ तालुका अशी या तालुक्याची ओळख आहे. मात्र विकासाच्या दृष्टीने कायम मागे राहिलेल्या पोलादपूर तालुक्यामध्ये सध्या बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून तालुक्यांमध्ये ह्या बेरोजगारीवर लघुउद्योग व पर्यटन विकासाने मात करता येऊ शकते. परंतु उदासीन लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांच्या अनास्थेमुळे आजही हा तालुका उपेक्षितच राहिला आहे.
तालुक्यातील नियोजित मिनी औद्योगिक वसाहत मध्ये रासायनिक कंपन्या ऐवजी लघु उद्योग सुरू करण्यात यावेत या मध्ये पेपर उद्योगासह फळ सह धान्यवर प्रकिया करणारे किंवा प्रदार्थ बनविणारे उद्योग उभारणे गरजेचे आहे कृषी क्षेत्र आणि त्याला जोडव्यवसाय देण्याची गरज निर्माण झाली आहे.
निवडणुकीपुरती आश्वासने
दरवर्षी निवडणूक च्या काळात तुर्भे ,लोहारे , दिवील गावा जवळ मिनी औद्योगिक वसाहतीचे गोड स्वप्न नेहमी दाखविण्यात येते, निवेदन च्या प्रति सर्वत्र पाठवल्या जातात. मात्र गेल्या 20 वर्षात कोणत्याही स्वरूपाची कार्यवाही करण्यात आली नाही. जिल्ह्यात रासायनिक कंपन्यांचे जाळे आहे मात्र या कंपन्या कडे अपघाता नंतर करण्यात येणार्या उपाययोजना अत्यल्प असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. मागील काही महिन्यात महाड सह इतर ठिकाणी झालेल्या अपघात नंतर निदर्शनास आले आह







