पोलादपूर नगरपंचायत: 13 प्रभागांमध्ये 43 उमेदवार

| पोलादपूर | प्रतिनिधी |
नगरपंचायत पोलादपूरच्या 17 प्रभागांमध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58 उमेदवारी अर्ज दाखल झाले असताना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पोलादपूर नगरपंचायतीच्या 4 नामाप्र प्रभागांमध्ये यावेळी निवडणूक होणार नसल्याने 14 उमेदवार आपोआपच रिंगणाबाहेर गेले आहेत. उर्वरित 13 प्रभागातील 15 अर्ज अवैध झाल्याने 43 उमेदवारी अर्ज रिंगणात राहिल्याचे चित्र छाननी आक्षेपानंतर दिसून येत आहेत. शिवसेना उमेदवार: प्रभाग 1 मध्ये सुनीता पार्टे आणि प्रभाग 2 साठी अस्मिता पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रभाग 3 साठी मनोज प्रजापती, प्रभाग 4 साठी रोहित सावंत, प्रभाग 5 साठी शिल्पा दरेकर, प्रभाग 6 साठी सुषमा पवार, प्रभाग 7 साठी रिमा बुरूणकर, प्रभाग 8 साठी सारिका पालकर, प्रभाग 9 साठी संगिता इंगवले, प्रभाग 11 साठी सारिका पालकर, प्रभाग 11 साठी मृगया शहा, प्रभाग 12 साठी सिध्देश शेठ, प्रभाग 13 साठी निलेश सुतार, प्रभाग 14 साठी विनायक दिक्षीत, प्रभाग 15 साठी नागेश पवार, प्रभाग 16 साठी सुरेश पवार आदींनी अधिकृत उमेदवारीसह नामनिर्देशन पत्र दाखल केली.

मनसे उमेदवार : प्रभाग 10 मध्ये प्रज्ञा प्रतीक सुर्वे, प्रभाग 12 मध्ये प्रज्ञा प्रतीक सुर्वे, प्रभाग 15 मध्ये तुषार अशोक पवार, प्रभाग 17 मध्ये दर्पण दिलीप दरेकर यांची नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

काँग्रेस उमेदवार : प्रभाग 1 मध्ये मीनल जगताप, प्रभाग 2मध्ये कल्पेश मोहिते, प्रभाग 3 मध्ये निखिल कापडेकर, प्रभाग 4 मध्ये अर्चना शिंदे, प्रभाग 5 मध्ये अपर्णा कदम, प्रभाग 6 मध्ये समिधा महाडीक, प्रभाग 7 मध्ये आशा गायकवाड, प्रभाग 8 मध्ये अनिता जांभळेकर, प्रभाग 9 मध्ये तेजश्री गरूड, प्रभाग 10 मध्ये शुभांगी चव्हाण, प्रभाग 11 मध्ये स्वप्नील भुवड, प्रभाग 12 मध्ये श्रावणी शहा, प्रभाग 13 मध्ये सचिन दुदुस्कर, प्रभाग 14 मध्ये प्रकाश भुतकर, प्रभाग 15 मध्ये शिवराज पार्टे, प्रभाग 16 मध्ये अमित भुवड, प्रभाग 17 मध्ये दिलीप भागवत या 17 अधिकृत उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. यावेळी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव स्नेहल जगताप यांच्यासमवेत विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीयश जगताप तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी उमेदवार: प्रभाग 5 मध्ये माधुरी विचारे, प्रभाग 13 मध्ये युवराज पवार, प्रभाग 15 मध्ये अनिलकुमार भोसले आणि प्रभाग 16 मध्ये अजित खेडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

भाजप उमेदवार : प्रसन्ना पालांडे यांनी प्रभाग 13 मधून, शीला बुटाला प्रभाग 4 मधून, रश्मी दिक्षित प्रभाग 6 मधून, अंकिता जांभळेकर यांनी प्रभाग 14 मधून तर एकनाथ कासुर्डे यांनी प्रभाग 15 मधून तर विशाखा आंबेतकर यांनी प्रभाग 3 मधून, हर्षदा बोरकर प्रभाग 7 मधून, मंजू मोरे प्रभाग 9 मधून तर प्रभाग 16 मधून नितीन बोरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

महेंद्र श्रीपती जाधव या उमेदवाराने प्रभाग 13मधून डॅडी अरूण गवळी प्रणित अखिल भारतीय सेनेतर्फे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. छाननीमध्ये काँग्रेस पक्षाचे शर्मिला दुदुस्कर, प्रियांका नांदगांवकर, शुभांगी भुवड, सारिका विचारे, समीरा महाडीक, मदार शेख आणि शुभांगी भुवड तर शिवसेनेचे स्वाती दरेकर, कल्पना सवादकर, निलीमा सुतार, रिया मोरे, प्रशांत आंब्राळे, प्रकाश गायकवाड आणि मनसेचे संदेश सुतार आणि अभासेनेच्या कोमल महेंद्र जाधव आदी 15 जणांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले.

14 नामाप्र उमेदवार रिंगणाबाहेर
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुक आयोगाने नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या आरक्षित प्रभागांतील निवडणुका रद्द केल्याने प्रभाग 2 मध्ये कल्पेश मोहिते, मनोज प्रजापती, सुरेश पवार, लहू पवार आणि संभाजी माने तसेच प्रभाग 8 मध्ये रिमा बुरूणकर आणि अनिता जांभळेकर, प्रभाग 10 मध्ये शुभांगी चव्हाण, संगिता इंगवले, प्रज्ञा सुर्वे, सायली सलागरे, प्रभाग 14 मध्ये निलेश सुतार, अंकिता जांभळेकर आणि प्रकाश भुतकर आदी 14 नामाप्र उमेदवारांचे अर्ज वैध ठरूनही ते सर्व रिंगणाबाहेर गेले आहेत.

Exit mobile version