असभ्य वर्तन करणाऱ्या महिलांविरोधात पोलिसांची कारवाई

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील रस्त्याच्या फुटपाथवर जाणूनबुजून व र्निलज्जपणे आपले शरीर उघडे टाकून असभ्य वर्तन करणाऱ्या सहा महिलांविरोधात पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी त्या परिसरातील रहिवाशी व मुख्यत्वे करून महिलावर्गांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत त्यांनी विशेष पथक तयार केले. यात सहा पो. निरीक्षक प्रज्ञा मुंडे, साधना पवार, ज्योती कांडळ, शितल कोकणे आदींच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन अश्या प्रकारे वर्तन करणाऱ्या सहा महिलांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात कारवाई केली आहे.

Exit mobile version