जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई

| पनवेल । वार्ताहर ।
बेकायदेशीर सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस उपायुक्त कार्यालय पथक व खांदेश्‍वर पोलिसांकडून धाड टाकत मुद्देमाल जप्त करण्यात आली आहे. यावेळी जुगार खेळणार्‍यावर कारवाई करीत खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खांदेश्‍वर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर जुगार सुरु असल्याची माहिती परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्तांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांचे पथक व खांदेश्‍वर पोलीस ठाण्याच्या पथकाकडून जुगार अड्ड्यावर धाड टाकत धडक कारवाई केली. यावेळी त्याठिकाणी जुगार खेळणार्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी पोलिसांनी जुगार खेळणाऱयांकडून 37000 रुपये रोकड व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी सहा जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, 1887, 12 अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version