पोलिसांच्या सतर्कतेमुळे दागिन्यांची पिशवी मिळाली

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे रिक्षा प्रवासादरम्यान रिक्षात विसरलेली सोन्याच्या दागिन्यांची पिशवी महिलेला पोलिसांनी परत मिळवून दिली आहे.

वत्सला राम पकडे (रा. घोट गाव) या खरेदी करता घोट गाव ते पनवेल भाजी मार्केट असा रिक्षाने प्रवास करताना त्यांच्यासोबत त्यांच्या घरातील अन्य चार महिला असे रिक्षामध्ये बसून महाराष्ट्र बँक, ओल्ड पनवेल समोर उतरल्या होत्या. सदर वेळी त्यांच्याकडे असलेली बाजाराकरिता आणलेली पिशवी ही सदर रिक्षामध्ये विसरुन गेल्या. सदर पिशवीमध्ये त्यांचे कानातील 5 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या साखळ्या होत्या. सदर महिला पनवेल शहर पोलीस ठाणे येथे त्यांची पिशवी रिक्षात विसरल्याची तक्रार देण्याकरता आल्या असता वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पो.ना. मिथुन भोसले, पोशि कराड, पोशि विशाल दुधे यांना माहिती देऊन महाराष्ट्र बँक ओल्ड पनवेल येथील सीसीटीव्ही तपासण्याकरता सांगितले. त्यांनी सदर ठिकाणचे सीसीटीव्ही तपासून त्या आधारे त्यांनी सदरची रिक्षा क्रमांक ही रिक्षा ट्रेस करून त्या रिक्षाचे डिटेल्स घेऊन त्याद्वारे रिक्षा चालक अनिकेत दुबे यांच्याशी संपर्क करून झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यांनी त्यांची रिक्षा तपासून सदर रिक्षात वत्सला पगडे यांची पिशवी असल्याचे आढळून आल्याने तो पनवेल शहर पोलीस ठाणे येथे हजर झाले. सदरची पिशवी व वत्सला पगडे यांच्या कानातील सोन्याच्या साखळ्या पोलीस उपनिरीक्षक वायकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या ताब्यात देण्यात आली. यावेळी वत्सला पगडे यांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

Exit mobile version