राहुल गांधींच्या ट्रॅक्टरला पोलिसांचा ब्रेक

नेत्यांनाही घेतलं ताब्यात
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी राहुल गांधी यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहचले. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकून बसलेल्या शेतकर्‍यांच्या समर्थनार्थ राहुल गांधी यांनी आज ट्रक्टरवर स्वार होत मोदी सरकारचा विरोध केला. पण राहुल गांधी संसदेत पोहचल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टरसह काँग्रेस नेत्यांनाही ताब्यात घेतलं. या सर्व घटनेमुळे सोशल मीडियावर काँग्रेस समर्थक नेटकर्‍यांनी दिल्ली पोलीस आणि मोदी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली.
सध्या संसदेचं मान्सून सत्र सुरु असल्यामुळं परिसरात कलम 144 लागू आहे. असं असतानाही राहुल गांधी काँग्रेस नेत्यासह ट्रक्टरवर स्वार होत संसदेत पोहचले. राहुल गांधी संसदेत पोहचले मात्र, नियमांचं उल्लघंन केल्याप्रकरण पोलिसांनी रणदीप सुरजेवाला आणि श्रीनिवास बी.वी या नेत्यांसह ट्रक्ट्रर आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

आम्ही शेतकर्‍यांचा संदेश घेऊन संसदेत आलो आहोत. शेतकर्‍यांचा आवाज दाबला जात आहे. सरकारला शेती कायदे मागे घ्यावेच लागतील. हे कायदे 2-3 बड्या उद्योगपतींसाठी आहेत. शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी नाहीत, नफ्यासाठी नाहीत. हे काळे कायदे आहेत.
राहुल गांधी,काँग्रेस नेते

Exit mobile version