। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग समुद्रकिनारी झालेल्या हत्याकांड प्रकरणातील चारही आरोपींना पकडण्यास अलिबाग पोलिसांसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला यश आले. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे करीत आहेत. अलिबाग समुद्रकिनारा, मेरीटाईम बोर्डच्या कार्यालयाशेजारी असलेल्या सिमेंट काँक्रिटच्या कट्ट्यावरती गडबमधील तरुणावर चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. ही घटना 30 नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती. अलिबाग पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करीत चौघांना जेरबंद केले.