सराईत त्रिकुटाला पोलिसांनी घेतले ताब्यात

1 लाख 85 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल परिसरातील अनेक महिलांच्या पर्स पळविणाऱ्या सराईत त्रिकुटाला अथक प्रयत्न करून तळोजा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून आतापर्यंत चोरीचा 1 लाख 55 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळोजा पोलीस ठाणे हद्दीत तक्रारदार शशिकला मिश्रा (49) रा. फेस 2, तळोजा या मॉर्निंग वॉक करत असताना मोटरसायकल वरील तीन अनोळखी व्यक्तींनी तक्रारदार यांची पर्स खेचून त्यातील मोबाईल व इतर मुद्देमाल जबरी चोरी करून घेऊन गेले होते. याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल होताच वपोनि प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि निलेश येवले, पोहवा अमर भोईर, विनोद डुंबरे पाटील, पोना हरिदास करडे, संभाजी कोळेकर, पोशी पाटील, विकास ठाकूर, मपोशि दिपीका चव्हाण आदींच्या पथकाने तळोजा, खारघर, कामोठे, सानपाडा, वाशी, मानखुर्द, चेंबूर, गोवंडी, टिळक नगर या ठिकाणचे एकूण 120 सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्ह्यातील आरोपीत निष्पन्न करून तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या मदतीने विधी संघर्ष बालकास ताब्यात घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणला. यांना ताब्यात घेतले असता त्यांच्यावर तळोजा पोलीस ठाणे, कामोठे पोलीस ठाणे, खारघर पोलीस ठाणे येथे अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील विधी संघर्षित बालकास मा. संचालक सो, बाल कल्याण समिती, कर्जत, जिल्हा रायगड यांचे समक्ष हजर करून त्यांचे आदेशाने कर्जत येथील बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

Exit mobile version