पोलिसांचा फौजफाटा तैनात; प्रशासन सज्ज

गणेशभक्तांचा प्रवास हा अधिक सुखकर व सुरक्षीत व्हावा, यासाठी रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे 6 पोलीस उपअधीक्षक, 16 पोलीस निरीक्षक, 27 सहा.पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, 274 पोलीस अंमलदार असा बंदोबस्त महामार्गावर ठेवण्यात आला असून 96 पोलीस मित्र स्वयंसेवक संस्था यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेशभक्तांना त्यांचे निश्‍चित ठिकाणी मार्गस्त होणेसाठी प्रबोधनात्मक आणि सूचनात्मक असे 60 बोर्ड महामार्गावर निदर्शनास येतील अशा ठिकाणी लावण्यात आले आहे. महामार्गावर पेण, वडखळ, कोलाड नाका, माणगाव, वाकणफाटा, लोणेरे, नातेखिंड, पोलादपूर, पाली गणेश हॉटेलजवळ, निजामपूर फाटा ढालघर फाट्याकडे, म्हैसदरापूल -कोलाड, माणगाव ढालघर फाटा असे एकूण 12 पोलीस मदतकेंद्र उभारण्यात आली असून प्रत्येक मदत केंद्राच्या ठिकाणी 12 क्रेन/ हायड्रा त्याचप्रमाणे एकूण 13 रुग्णवाहिका मदत केंद्राच्या ठिकाणी सुसज्यपणे ठेवण्यात आलेल्या आहेत. गणेशोत्सवाकरीता जाणार्‍या गणेशभक्तांना क्रेन/रुग्णवाहिका चालकांचे फोन नंबर्स अत्यावश्यक प्रसंगी माहित व्हावे याकरिता लीफलेटचे वाटप करण्यात आले आहे.मुंबई गोवा महामार्ग क्रमांक 66 व पालीफाटा (खोपोली) वाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 अ या दोन्ही महामार्गावर महत्वाच्या ठिकाणी एकूण 16 सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसविण्यात आलेले असून पर्यायी मार्गांच्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेटस, प्लॅस्टिक पोल लावून योग्य ते वाहतूक नियमन करण्यात आले आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शासनाचे आदेश
हाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे गणेश चतुर्थी निमित्ताने कोकणवासियांच्या सोयीसाठी जादा बसेस सोडण्याची व्यवस्था करण्यात येते. राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वरुन जड वाहने व रेतीची वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहतुकीमुळे या कालावधीत कोकणाकडे ये-जा करणार्‍या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून वाहनांची कोडी होऊन प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी तसेच चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, याकरीता या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवाकरिता कोकणात येणार्‍या गणेशभक्तांची गैरसोय होवू नये, पनवेल ते इन्सुली (सावंतवाडी) या राष्ट्रीय महामार्गावरील पनवेल ते सिंधुदूर्ग मार्गे पेण, वडखळ, नागोठणे, कोलाड, इंदापूर, महाड, खेड, चिपळूण, संगमेश्‍वर, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी वरुन होणारी वाळू/ रेती भरलेले ट्रक, ट्रेलर्सची तसेच अवजड वाहनांच्या वाहतुकीबाबत शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत.

गेल्या 25 वर्षात कधीच रस्ते चांगले नव्हते. ही दरवर्षीची समस्या आहे. अनेकदा मागणी करुनही त्यावर कोणतीही उपाययोजना होत नाही. त्यामुळे खड्डेमय रस्त्यावरुन वाहन हळू चालवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. या सार्‍याचा गणपती वाहतूक करणार्‍या सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो, हे नक्की. अशा परिस्थितीतही भाविक गणरायाला सुखरुप घरी नेतात.

-श्रीकांत देवधर, मुर्तीकार, पेण
Exit mobile version