। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील बिरमुळे हॉस्पिटल परिसरात एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून, त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. इसमाचे अंदाजे वय 40 ते 50 वर्ष, अंगाने मध्यम, केस काळे, चेहरा उभट असून , अंगात ग्रे रंगाचे हाफ बाह्याचे टीशर्ट व पिवळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट घातलेली आहे. या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे, फोन – 022-27452333 किवा सहाय्य्क पोलीस निरीक्षक संतोष शेटे यांच्याशी संपर्क साधावा.