स्व. कमलाकर वैशंपायन यांच्या तैलचित्राचे अनावरण
| उरण | वार्ताहर |
गेली अनेक वर्षे म्हणजेच आपल्या आयुष्याची 51 वर्षे ज्यांनी जगातील प्रेक्षकांना हसविण्यासाठी जन्म घेतला ते स्व. कमलाकर वैशंपायन या महान कलाकाराच्या तैलचित्राचा समावेश पनवेल महानगरपालिकेच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या दालनात करण्यात आल्यामुळे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि जॉनी लिव्हर यांच्या माम या संस्थेच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी स्व. कमलाकर वैशंपायन यांच्या पत्नी यांच्यासह त्यांच्यासोबत काम केलेले कला सागरचे श्रीकांत मुंबईकर, हास्य सम्राट जॉनी रावत, जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे, प्रीती जॉर्ज-म्हात्रे, सुरेखा मोहोकर, साई संस्थान वहाळचे संस्थापक अध्यक्ष रवीशेठ पाटील हे देखील उपस्थित होते.