अतिउत्साही पर्यटकांना कायद्याचा बडगा

वाढते अपघात रोखण्यात यश
पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांचे प्रयत्न
खोपोली | वार्ताहर |
खोपोली,खालापूर परिसरात पावसाळी पर्यटनासाठी येणार्‍या अतिउत्साही पर्यटकांच्या उत्साहावर कायद्याचा धाक दाखवून निर्बंध आणल्याने पर्यटनस्थळी होणारे अपघात टाळण्यात पोलीस यंत्रणेला यश आलेले आहे.यासाठी पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांचे प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसत आहे.
यंदाच्या पर्यटन मोसमात वीकेन्ड आणि हॉलीडेचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात खालापूर तालुक्यात दाखल होत आहेत. त्यांच्या अतिउत्साहामुळे नदी, तलाव,धबधबे,धरणात बुडून होणार्‍या पर्यटकांते बळी जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पर्यटकांच्या या मृत्यूला आळा घालण्यासाठी रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून पर्यटकांसाठी जिल्हाबंदीचे निर्देश दिले होते.असे असतानाही पर्यटनावर बंदी .अतिवृष्टीने हाहाकार उडालेला असूनहा पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे येथून बेधुंद पर्यटकांचे जत्थेच्या जत्थे निर्बंध जुगारत पर्यटनाचा असुरी आनंद घेताना दिसत आहेत.परिणामांती अनेक पर्यटकांना जीवाशी मुकावे लागले.
पर्यटकांच्या मृत्यूच्या घटनेने व्यथित झालेल्या खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी असे दुर्दैवी अपघात घडूच नयेत म्हणून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या कार्यकारिणीसोबत याबाबतीत उपाययोजनांच्या संदर्भात चर्चा करून तातडीने उपवभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या परवानगीने अपघात प्रवण क्षेत्रांत पोलीस कर्मचारी नेमण्याचा, दंडात्मक कारवाई करण्याचा आणि संबंधित विभागातील पोलीस पाटील यांना सतर्क ठेवण्याचा निर्णय घेतला.

चौक ते वावोशी पर्यटकांना मज्जाव
पोलिसांच्या विविध उपाय योजनांच्या अनुषंगाने खालापूर पोलीस ठाण्याच्या परिक्षेत्रात येणार्‍या चौक आणि वावोशीपर्यंतच्या हद्दीत पर्यटकांना येण्यासाठी मज्जाव केला गेला. पोलीस यंत्रणेकडून अवलंबलेल्या कार्यवाहीमुळे साधारणपणे मागील दोन आठवड्याचे वीक एन्ड आणि महत्वाच्या सुट्ट्यांच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

पर्यटकांच्या उत्साहाला आळा घालण्यासाठी केलेल्या उपायांमुळे मृत्यूला रोखण्यात यश आले आहे.भविष्यातही अशा घटना टाळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने दुर्घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
अनिल विभुते, पोलीस निरीक्षक

Exit mobile version