पोलिसांनी जपली सामाजिक बांधिलकी

स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांचा सत्कार

| पनवेल । वार्ताहर ।

नेहमीची गुन्हेगारी, अपघात, कौटुंबिक वाद व इतर गुन्ह्यांच्या तपासामध्ये अडकलेल्या पोलीस खात्यामध्ये माणुुसकी व सामाजिक बांधिलकीची सुद्धा जाण असते याचा प्रत्यय आज येवून पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर यांनी स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबियांच्या घरी जावून त्यांच्या पत्नीचा सत्कार करून एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.

स्वातंत्र्य सैनिक सुदामराव दिक्षित यांच्या कुटुंबातील सदस्यांना दौंडकर व त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्या राहते घरी जाऊन भेट घेतली. त्यांनी मिठाचा सत्याग्रह 1928-29, चलेजाव आंदोलन 1942, इत्यादी चळवळीमध्ये भाग घेतला होता. त्यामुळे त्यांना अनेक वेळा नांदेड, औरंगाबाद नागपूर अशा विविध ठिकाणी तुरुंगवास देखील भोगावा लागला. अशा या स्वातंत्र्य सैनिक यांच्या पत्नी मैनाबाई दीक्षित वय.97 वर्षे व त्यांची मुलगी आशा दीक्षित हे तालुका हद्दीतील कोन गाव येथील इंडिया बुल्स ग्रीन सोसायटी येथे राहत असल्याने त्या ठिकाणी जावून त्यांच्या पत्नीचे दौंडकर यांनी सत्कार केला.

Exit mobile version