पोलिस निरीक्षक शिरीष पवार, सहा. फौजदार आनंद घेवडे यांचा होणार सन्मान
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष कामगिरी बजावणार्या देशभरातील पोलिस कर्मचार्यांना जाहिर करण्यात आलेल्या पोलिस पदकांमध्ये महाराष्ट्रातील 39 अधिकार्यांना पदकं जाहिर करण्यात आले. त्यापैकी रायगड पोलिस दलातील खोपोलीचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार आणि बिनतारी संदेश विभागाचे सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंद घेवडे यांना पदक जाहिर करण्यात आले आहेत.
रायगड पोलिस दलातील या दोन्ही पोलिस पदक प्राप्त अधिकार्यांचे पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे आणि अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी अभिनंदन केले आहे. शिरीष पवार हे रायगड पोलिस दलातील खोपोली पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. तर सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंद घेवडे हे बिनतारी संदेश विभागात कार्यरत आहेत. या दोन्ही अधिकार्यांनी आपल्या कारकिर्दीत बजावलेल्या विशेष गुणवत्ता पुर्ण सेवेबद्दल त्यांना हे पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.
या दोन्ही अधिकार्यांना प्रजासत्ताक दिनाच्या जिल्ह्याच्या मुख्य प्रजासत्ताक दिन सोहळ्यात जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आणि पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.