निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे ऑपरेशन ऑलआऊट

| पनवेल | वार्ताहर |

तालुका पोलिसांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रात ऑलआऊट ऑपरेशन मोहीम पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभागचे अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील व पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध परिसरात जाऊन राबविली. यावेळी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई करण्यात आली.

त्यामध्ये प्रामुख्याने अंमली पदार्थ विरूद्ध कारवाई करताना 02 आरोपी अटक करण्यात आले असून, त्यापैकी एका महिला आरोपीचे घरझडतीमध्ये 48,840/- रू. किमतीचा 2.396 कि.ग्रॅ कोरडा गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच अंमली पदार्थाचे सेवन करणारे दोन इसमांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भारतीय हत्यार कायदा 3(25) प्रमाणे एक गावठी पिस्तुल व 05 जिवंत राऊंड जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. तसेच भारतीय हत्यार कायदा क -4 (25) प्रमाणे एक लोखंडी धारदार घातक शस्त्र जप्त करण्यात आले आहे. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65(ई) अन्वये एकूण 11 गुन्हे दाखल करून देशी, विदेशी व हातभट्टी दारू (विनापरवाना विक्री) जप्त करण्यात आली आहे. परिसरातील हिस्ट्रीशिटर, गुंडा चेकिंग करण्यात आली यात 03 जण मिळून आले. पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 02 ठिकाणी नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली होती. सदर ऑल आऊट ऑपरेशन करिता पनवेल तालुका पोलीस ठाणे कडील 02 पोनि, 06 सपोनि/ पोउपनि, 44 पोलीस अंमलदार हजर होते. अशी माहिती पनवेल तालुका पो. ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.

Exit mobile version